पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा महत्त्वाची

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येत असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी चेन्नईमध्ये भेट घेणार आहेत. दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा द्विपक्षीय प्रश्नांवर अनौपचारिक स्वरुपाची चर्चा होणार आहे. या आधी गेल्यावर्षी २७ आणि २८ एप्रिलला चीनमधील वुहानमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक स्वरुपाची चर्चा झाली होती.

वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला आग; हार्बर रेल्वे विस्कळीत

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, जागतिक आणि दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या अनौपचारिक भेटीमुळे दोन्ही देशांतील नेत्यांना संधी मिळणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ व्हावे, यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत

चेन्नईपासून ५६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मामलापूरममध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध विविध मुद्द्यावरून नव्या वळणांवर असताना ही भेट होत असल्याने त्याचे महत्त्व जास्त आहे. डोकलामच्या प्रश्नावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर गेल्यावर्षी वुहानमध्ये पहिल्यांदा मोदी आणि जिनपिंग यांच्यात या स्वरुपाची चर्चा झाली होती. आता केंद्र सरकारने लडाख हा नवा केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केला आहे. त्याला चीनने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या बैठकीत त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chinese president Xi Jinping to meet PM Modi on Oct 11 12 in Chennai for second informal summit