पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास

जिनपिंग यांचा कारनं प्रवास

भारत- चीन दुसऱ्या अनौपचारिक चर्चेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. त्यानंतर    तामिळनाडूतील महाबलिपूरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांनी भेट दिली. महाबलिपूरम येथील प्रवासात क्षी यांनी हेलिकॉप्टरनं जाणं टाळलं त्याऐवजी त्यांनी आलिशान कारनं प्रवास केला. मोदी हे हेलिकॉप्टरनं महाबलिपूरम येथे आले होते. तर क्षी यांनी त्यांच्या Hongqi limousine कारनं ५७ किलोमीटरचा प्रवास केला. 

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षाव्यवस्था कडक

चीनमध्ये Hongqi चा अर्थ होतो लाल बावटा. चीनमधली कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेते ही आलिशान कार वापरतात. चीनमधले कोणतेही नेते प्रवासासाठी हेलिकॉप्टर वापरत नाहीत, हा अलिखित नियमच आहे, अशी माहिती बिजिंगमधल्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. Hongqi ही चीनमध्येच तयार करण्यात आलेली कार आहे. त्यामुळे अनेक चिनी नेते आपल्या परदेशी दौऱ्यावर चीनमध्येच  तयार झालेल्या कारना प्राधान्य देतात. 

१२ व्या वर्षी मुकेश अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत

चीनचे नेते हे विमान किंवा कारनं प्रवास करतात त्यामुळे क्षी यांनी  चेन्नई ते  महाबलिपूरम आलिशान कारनं प्रवास केला.  एप्रिल महिन्यात क्षी यांनी तीन देशांना भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी अशाच प्रकारची बुलेटप्रुफ कार वापरली होती.