राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील जे के लोन रुग्णालयात ३५ दिवसांमध्ये ११२ बालकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागील प्रमुख कारणांमध्ये थंडी वगळता चीनची वैद्यकीय उपकरणे, भ्रष्टाचार आणि कमिशन असल्याचे समोर आले आहे. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी सांगितले की, कोटा येथील जे के लोन रूग्णालयात चीनने तयार केलेली कमी दर्जाची उपकरणे वापरली जात होती.
भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...
जयपूरमध्ये वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी त्यांनी सांगितले की, 'चीनने तयार केलल्या उपकरणं खरेदीची आम्ही चौकशी सुरू केली आहे. या उपकरण खरेदीमध्ये कोणाचा हात आहे याची चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य रोहितकुमार सिंह करतील असे त्यांनी सांगितले. यापूर्वी, राज्य आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी जे के लोन रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हायपोथर्मिया असल्याचे सांगितले.
विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका
दरम्यान, जे के लोन रुग्णालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच सांगितल्या आहेत. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'महिनाभरापासून खराब झालेली उपकरणं दुरुस्त करण्यासाठी खासगी कपंनी किंवा तज्ज्ञांना बोलावलेच गेले नाही. तर, कमिशन वाटपाच्या समस्येमुळे उपकरण दुरुस्त करण्यात आली नाहीत का? असा सवाल रुग्णालयाचे अधिक्षक सुरेश दुलारा यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी असे सांगितले की, कमिशन वाटप हा चुकीचा शब्द आहे. मात्र वरच्या स्तरावर गंभीर अनियमितता होती त्यामुळे उपकरणं खराब झाली आहेत.