पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनासंदर्भात सर्वात आधी धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा चीनमध्ये मृत्यू

डॉक्टर ली वेनलियांग

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत सर्वात आधी धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे. ली वेनलियांग यांना सुध्दा कोरोनाची लागण झाली होती.  गुरुवारी रात्री उशिरा उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६३६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.  

सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, आठवड्यातील दुसरी घटना

सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार,  ३४ वर्षीय डॉक्टर ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी चीनला कोरोना विषाणूचा धोका असल्याचा इशारा दिला होता. गुरुवारी रात्री वुहान येथे कोरोना विषाणूमुळेच ली वेनलियांग यांचा मृत्यू झाला. वेनलियांग यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यांचा मृत्यू झाला. 

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ६३६ वर

वुहानमध्ये कोरोना विषाणूचा धोका असल्याचे सांगणारे वेनलियांग हे पहिले डॉक्टर होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी कोरोनाच्या धोक्याची माहिती सांगितली होती. वेनलियांग यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपल्या सहकाऱ्यांना मॅसेजिंग अॅपवर चॅट करताना सांगितले होते की, 'स्थानिक मासळी बाजारातून आलेल्या सात रुग्णांमध्ये 'सार्स'     (सिवियर एक्यूट रेस्पीरेटरी सिंड्रोम)सारख्या आजाराची लक्षणे आढळली असून त्यांच्यावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरु आहेत.' 

अमेरिकेच्या हल्ल्यात अल कायदाचा नेता कासिम अल-रेमी ठार

त्यांनी पुढे असे देखील सांगितले होते की, परिक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की हा विषाणू कोरोना विषाणूच्या गटातील आहे. याच गटातील सार्स हा विषाणू आहे. ज्यामुळे २००३ साली चीनसह जगभरातील ८०० जणांचा बळी गेला होता. वेनलियांग यांनी आपल्या मित्रांना त्यांच्या कुटुंबियांना जागरुक राहण्यास  सांगायला सांगितले होते. त्यांनी सांगितलेली माहिती  काही तासांतच व्हायरल झाली. त्यावेळी पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर अफवा पसरवत असल्याचा आरोप केला होता. 

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु