पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची दहशत, मृतांचा आकडा १८०० वर

 कोरोनाची दहशत, मृतांचा आकडा १८०० वर

कोरोनामुळे चीनच्या हुबैई  प्रांतात मंगळवारी ९३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १८०० वर गेली आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे दहशत पसरली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सोमवारी कोरोनाची लागण झालेली १, ८०७ नवी प्रकरणं समोर आली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. 

'त्या' जहाजमधील आणखी दोन भारतीयांना कोरोनाचा विळखा

वुहान हे कोरोनाचे केंद्रबिंदू आहे. वुहान आणि हुबैई  या प्रांतात कोरोनाची फैलावर अधिक आहे. इथे गेल्या महिन्याभरापासून लोक घरातच जायबंदी झाले आहे. कोरोनाच्या भीतीनं लोक घराबाहेर पडेनासे झाले आहेत. कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवरही याचा गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. 

मांसाहारी लोकांना शिक्षा देण्यासाठी कोरोना अवतार, हिंदू महासभेचे मत

चीनमध्ये ताज्या आकडेवारीनुसार ७० हजार ५०० लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. हळूहळू या विषाणूने कहर करत अनेकांचा बळी घेतला.