पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर परिणामांना सामोरे जावे लागले, ट्रम्प यांची चीनला तंबी!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनला तंबी वजा सूचनेचा इशारा दिला आहे. जर चीनने व्यापार करार केला नाही तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना दिला आहे. जवळपास २०० अमेरिकन कंपन्या चीनमधून भारताकडे आपला मोर्चा वळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असताना ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून चीनला सुनावले.

पाकला F-16 विकणारी कंपनी भारताला F-21 देण्यास तयार 
 

त्यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, "मी चीनचे अध्यक्ष आणि सर्व मित्रांना जाहिररित्या सांगू इच्छितो की, जर तुम्ही व्यापार करारावर योग्य भूमिका घेतली नाही तर चीनला मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. कारण हा करार न झाल्यास चीनमध्ये असणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना अन्य देशात जाण्याचा मार्ग खुला होईल. 

श्रीलंका दंगल: चार शहरात कर्फ्यू, सोशल मीडियावर बंदी

या ट्विटमध्ये त्यांनी चीनमधील खरेदी महागडी असल्याचा उल्लेखही केला आहे. तुमच्या समोर चांगला प्रस्ताव होता. त्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. पण तुम्ही मागे हटला आहात, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनला सुनावले. उल्लेखनिया आहे की चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंदर्भात झालेली बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय  संपली होती.