पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशास चीनचा अडथळा

एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशास चीनचा अडथळा

अणुपुरवठादार गटामध्ये (एनएसजी) समावेश होण्याच्या भारताच्या प्रयत्नाला चीनकडून पुन्हा एकदा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. बिगर एनपीटी देशांसाठी विशेष कार्ययोजना राबवण्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये, असे चीनचे म्हणणे आहे. त्याचबरोबर यासाठी कोणतीही वेळमर्यादा देण्यासही त्यांचा नकार आहे.

मालदीवच्या संसदेतून मोदींचा पाकिस्तान, चीनवर निशाणा

मे २०१६ मध्ये भारताने एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. पण चीनचा पहिल्यापासून भारताच्या सदस्यत्वाला विरोध आहे. ज्या देशांनी एनपीटीवर स्वाक्षरी केली आहे त्याच देशांचा एनएसजीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो, असे चीनचे म्हणणे आहे. जगात ज्यापद्धतीने अणवस्त्रांचा धोका आहे. त्या दिशेने आम्हाला विचारपूर्वक पुढे जावे लागेल. एखाद्या देशाला सदस्य करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही चीनने म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानने २०१६ मध्ये एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. चीनच्या प्रवक्त्याने याबाबत म्हटले की, एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी एनपीटीवर हस्ताक्षर करणे बंधनकारक आहे. भारताने हस्ताक्षर केलेले नाही. आमचा भारताला विरोध नाही. पण ज्यापद्धतीने जगात शक्ती संतुलन एकतर्फी होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला विचारपूर्वक पुढे जावे लागेल. 

मोदी सरकार नौदलासाठी घेणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर

एनएसजीमध्ये एकून ४८ देश आहेत. जगातील अणु व्यापारावर नियंत्रित करण्याचे काम एनएसजीकडून होते. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला अमेरिका, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि जर्मनी या देशांचा आक्षेप नाही. चीनच्या मते भारताने एनएसजीचे सदस्य व्हावे. पण त्यांनी नियमांचे पालन करावे.