पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सुधारणा, मृतांचा आकडा १३०० ने वाढला

कोरोना विषाणू

गेल्या काही दिवसांपासून ज्याबद्दल शंका घेतली जात होती. ते अखेर खरे ठरले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या संख्येत चीनकडून वाढ करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमध्ये या आजारामुळे मृत पावलेल्यांचा आकडा जवळपास १३०० ने वाढविण्यात आला आहे. चीनकडून जारी करण्यात आलेल्या सुधारित आकडेवारीमधून हे समोर आले आहे. चीनमध्ये या आजारामुळे मृत पावलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ही वाढ तब्बल ४० टक्के इतकी आहे.

अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणखी उपाय

नव्या आकडेवारीनुसार चीनमध्ये या आजारामुळे तब्बल ४६३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हुबेई या प्रांतामध्ये आणि त्याची राजधानी असलेल्या वुहानमध्ये सर्वात आधी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला सुरुवात झाली होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या ठिकाणी कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळायला लागले होते. तिथेच सर्वाधिक रुग्ण मृत्युमुखी पडल्याचे चीनमधील सरकारने म्हटले आहे.

पाच दिवसांत धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या किती आहे, याची माहिती तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून दिली जात होती. पण सुरुवातीपासून या आकडेवारीबद्दल जागतिक पातळीवर शंका उपस्थित केल्या जात होत्या. चीन रुग्णांची संख्या कमी दाखवत असल्याची शंका उपस्थित केली जात होती. अखेर ती खरी ठरली आहे. चीनने आता कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या आधीच्या आकडेवारीत वाढ केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ३२५ ने वाढविण्यात आली आहे. चीनमध्ये १६ एप्रिल अखेर एकूण ५०३३३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नवी माहिती देण्यात आली आहे.