पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमधून दिलासादायक बातमी, वुहानमध्ये मागील ५ दिवसांत एकही रुग्ण नाही

चीनमधील रुग्णालयाबाहेरील दृश्य

जगभरात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असतानाच चीनमधील वुहानमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वुहानमध्ये पाचव्या दिवशीही कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु, विदेशातून आलेले ३९ आणखी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चीनमधील वुहान हे तेच शहर आहे. जिथे डिसेंबरमध्ये सर्वांत पहिला कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळून आला होता. 

कोरोना विषाणूमुळे चीनमधील वुहानमध्ये कडक पावले उचलली गेली होती. वुहानमध्ये सुमारे ५६ मिलियन लोकांना घरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूने संक्रमिक लोकांमध्ये घसरण झाल्याचे सांगण्यात येते. तर याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही वुहानचा दौरा केला होता आणि आरोग्य सेवेचा आढावा घेतला होता. 

२७ तारखेपासून प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये लॅब सुरु होईल: आरोग्यमंत्री

बीजिंगला येणाऱ्या सर्व विमानांना दुसऱ्या शहरात वळवण्यात येत आहे. तिथे प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाईल, असे चीनच्या विमान सेवेशी निगडित एका अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. चीनमध्ये कोरोना विषाणूनचे आतापर्यंत ८१ हजाराहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर ३२७० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

जगभरात कोरोना विषाणूने संक्रमित लोकांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. इटलीपासून भारत आणि अमेरिकापर्यंत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे.

दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती