पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड -१९: वुहानमध्ये अमेरिकन पथकाला प्रवेश देण्यास चीनचा नकार

चीनचे प्रमुख जिंगपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन अमेरिका-चीन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना विषाणूची उत्पती नेमकी कशी झाली याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला वुहानमध्ये प्रवेश मिळावा, अशी विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. चीनने याला नकार दिला आहे. आम्ही गुन्हेगार नसून कोरोना विषाणूचे पीडित आहोत, असे सांगत चीनने अमेरिकेच्या पथकाला प्रवेश नाकारला आहे. 

कोविड-१९ : या निर्णयासंदर्भात ममतांनी मोदी-शहांकडे मागितले स्पष्टीकरण

कोरोना विषाणू हा चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत तयार झाला का? यासंदर्भात अमेरिका तपास करत आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात चीनवर अनेकदा थेट निशाणाही साधलाय. ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांवर चीनचे परराष्ट्रमंत्र्याचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. विषाणू हा मानवजातीचा शत्रू आहे. आम्ही गुन्हेगार नसून आम्ही ही या विषाणूने त्रस्त झालेलो पीडित आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.   

नव्या ४६६ रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर

कोरोना विषाणूचा चीनपेक्षाही अमेरिकेला अधिक प्रभावित केले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७ लाख  ६४ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४१ हजारहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आ.पला जीव गमावला आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण हा चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. चीनने सुरुवातीला यासंदर्भातील माहिती लपल्यामुळे संपूर्ण जगावर आज कोरोना विषाणूचे संकट घोंगावत असल्याचा आरोप अमेरिकेकडून चीनवर करण्यात येत आहे.