पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानमधील कोरोनाच्या रुग्णांसाठी चीनकडून हॉस्पिटलची उभारणी

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टर (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचदरम्यान चीनकडून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पाकिस्तानमध्ये एक तात्पुरते रुग्णालय उभारले जात आहे. चीनने काही दिवसांपूर्वीच एक वैद्यकीय पथक पाकिस्तानला पाठवले आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर

आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू प्रकरणांची संख्या ही १६६४ पर्यंत पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, नुकताच पाकिस्तानमध्ये हा आजार बळावला आहे. आम्ही त्यांची परिस्थिती समजू शकतो. चीन सरकारने पाकिस्तानला तपासणी किट, मास्क, संरक्षक सूट आणि व्हेटिंलेटर आदी साहित्य पुरवले आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारण्यासाठीही मदत करणार आहोत. मागील आठवड्यात रुग्णालयाची उभारणी सुरु केली आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ, दोन दिवसांत १२ कोटी जमा

चीनने फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला वुहानमध्ये २३०० बेडची क्षमता असलेले दोन तात्पुरते रुग्णालय उभारले होते. चुनयिंग म्हणाल्या की, चीनने कोरोना विषाणूवर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सामील होण्यासाठी पाकिस्तानला आमंत्रित केले आहे आणि तज्ज्ञांचे एक पथक इस्लामाबादमध्ये आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू