पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा कहर: चीनमधील मृतांचा आकडा ९०२ वर

कोरोना विषाणू

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने आतापर्यंत  ९०२ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ४० हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील जनतेची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूमुळे रविवारी ९७ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ मृत वुहानमधील आहे.

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

रविवारी ४ हजार ८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामधील २९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर रविवारी ३ हजार २८१ रुग्णांना उपचार संपल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ४० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 ऑस्करमध्ये पहिल्यांदाच 'पॅरासाइट'नं रचला इतिहास

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये विशेष पथक पाठवणार आहे. सोमवारी ते मंगळवारपर्यंत पथकाचे प्रमुख चीनमध्ये रवाना होतील त्यानंतर इतर सदस्य याठिकाणी पोहचतील, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी दिली आहे. 

SC/ST कायद्यातील सुधारणा वैध, तक्रारीनंतर चौकशीआधी अटक शक्य