पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा कहर: चीनमध्ये मृतांचा आकडा ७२२ वर, अमेरिकेत एकाचा मृत्यू

कोरोना विषाणू

चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाने आतापर्यंत ७२२ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ३४ हजार ५४६ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे शुक्रवारी ८६ नागरिकांचा मृत्यू झाला. यामधील ८१ नागरिकांचा मृत्यू हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानमध्ये झाला आहे. त्या व्यतिरिक्त हिलॉन्गजियांगमध्ये दोन, बिजिंग, हेनान आणि गांन्सूमध्ये एक-एक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने पुढे असे सांगितले की, 'शुक्रवारी आणखी २६ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मकाऊमध्ये १०, ताइवानमध्ये १६ जणांना कोरोनाची लागण झाली. तर शुक्रवारी एकूण ४ हजार २१४ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. यापैकी १ हजार २८० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ५१० नागरिकांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही : शरद पवार 

दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण ६ हजार १०१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. २७ हजार ६५७ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २ हजार ०५० रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. चीनव्यतिरिक्त भारतसह २७ पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे प्रकरण समोर आली आहेत. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती नाजूक