पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ६३६ वर

कोरोनाचा कहर

चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ६०० च्यावर पोहचला आहे. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६६३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनच्या वुहानमधून पसरणाऱ्या या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु, पण...'

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीन सरकारने शुक्रवारी सांगितले की चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ३१ हजार १६१ झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक मोठा गट आहे. मात्र यापैकी फक्त सहा विषाणूंची नागरिकांना लागण होत आहे. या विषाणूची लागण झाल्यास नागरिकांना सर्दी-ताप येतो. तर, 'सिवीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम' (सार्स) हा एक असा कोरोना विषाणू आहे ज्यामुळे २००२-२००३ साली चीन आणि हाँगकाँगमध्ये जवळपास ६५० नागरिकांचा मृत्यू झाला होता.

'फडणवीस दिल्लीत गेले तर आनंद, महाराष्ट्राला चांगला उपयोग होईल'