पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनापुढे चीन सरकार हतबल, आतापर्यंत १,७६५ नागरिकांचा मृत्यू

कोरोना विषाणू

जगभरात आणि विशेषत: चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. रौद्ररुप धारण केलेल्या कोरोनामुळे चीनमध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या विषाणूमुळे एका दिवसामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. आता आलेल्या आकडेवाडीनुसार चीनमध्ये कोरोनाने १,७६५ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ६७ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. वेगवेगळ्या उपाय योजना करुन सुध्दा कोरोनाच्या रुग्णांना वाचवण्यात चीनला यश येत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूपुढे चीन सरकार हतबल झाले आहे.

...नाहीतर पंतप्रधान मोदींची माफी मागाः फडणवीस

चीनच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ६६ हजार ४९२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, २,६४१ जणांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर शनिवारी १,३७३ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. चीन व्यतिरिक्त हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर हाँगकाँगमध्ये ५६ जणांना आणि मकाऊमध्ये १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

यवतमाळमध्ये भीषण अपघात; ७ ठार, १५ जखमी

कोरोना विषाणूमुळे आशियाच्या बाहेर एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. फ्रान्स फिरण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या चीनी महिला पर्यटकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २५ जानेवारीला या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. हळूहळू या विषाणूने कहर करत अनेकांचा बळी घेतला.  

प्रचंड दबाव तरीही सीएए, ३७० च्या निर्णयावर ठामः मोदी