पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १,६६५ नागरिकांचा मृत्यू

कोरोना विषाणू

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने एका दिवसात १४२ जणांचा बळी घेतला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत १,६६५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ६८ हजार ५०० नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आणखी २,००९ नागरिकांना या विषाणूची लागण झाली असल्याचे सांगितले. 

कोरोना विषाणूमुळे सिंगापूरमध्ये कंडोम खरेदीसाठी गर्दी

हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये आणखी १,८४३ नागरिकांना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर २०१९ पासून कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. एकट्या हुबेन प्रांतात ५६,२४९ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.

खुनाच्या आरोपाखाली १४ वर्षे तुरुंगात, तरीही झाला डॉक्टर 

चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ज्या १४२ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामधील १३९ नागरिक हुबेईमधील आहेत. तर सिचुआनमध्ये दोन आणि हुनानमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९,४२९ नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

महाविकास आघाडी अंतर्गत मतभेदामुळे तुटेलः एकनाथ खडसे