पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत घेतला १,११० नागरिकांचा बळी

कोरोना विषाणू

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीन सरकार बरेच प्रयत्न करत आहे तरी सुध्दा मृतांचा आकडा थांबायचे नाव घेत नाहीये. बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४२,७०८ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. 

मनसेच्या मोर्चाचा इम्पॅक्ट; विरारमध्ये २३ बांगलादेशींना अटक

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या १,०१७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर चीनमध्ये आतापर्यंत ४२, ७०८ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसंच, जगभरामध्ये ३९० नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

आसाम NRC डेटा ऑफलाईन होण्यामुळे घाबरू नका

चीनमध्ये कोरोना विषाणू हळूहळू रौद्ररुप धारण करत आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. तर जगभारातील २० देशांमध्ये हा विषाणू पोहचला आहे. त्याठिकाणी देखील कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

पवईत पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू, पोलिसांचा नवऱ्यावर

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष पथक सोमवारी रात्री चीनमध्ये दाखल झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर 

दरम्यान, कोरोनासंदर्भात जिनेवामध्ये ४०० वैज्ञानिकांची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. यामध्ये झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूला केस रोखता येईल यावर चर्चा सुरु आहे. तर, कोरोनाच्या प्रसाराबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल चीन सरकारने वुहानमधील अनेक अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले.

अरविंद केजरीवाल यांचा येत्या रविवारी शपथविधी