पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनकडून मोदींची प्रशंसा, 'कोरोनो'शी लढण्यासाठी दिला होता मदतीचा प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

कोरोना विषाणूशी तोंड देत असलेल्या चीनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यावरुन त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहिले होते. चीनने पंतप्रधान मोदींनी उचललेल्या पावलाबद्दल त्यांची प्रशंसा केली आहे. भारताने अशा परिस्थितीतही चीनबरोबर आपली मैत्रीची भावना दाखवली आहे, असे चीनने म्हटले आहे. 

आरएसएसची कार्यालये, पदाधिकारी दहशतवाद्यांच्या रडारवर

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग म्हणाले की, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारताच्या मदतीसाठी धन्यवाद आणि हे प्रशंसनीय पाऊल आहे. 

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांना रविवारी पत्र लिहून मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या प्रकोपावरुन चीनच्या लोकांबरोबर भारताची एकजुटता व्यक्त केली होती. 

हिंगणघाट पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींनी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकोपाशी सामना करण्यासाठी भारताच्या मदतीचा प्रस्ताव दिला होता. नुकताच भारताने सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना चीनच्या वुहान शहरातून भारतात परत आणले होते. 

चीनमध्ये घातक कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढून ९०० पर्यंत पोहोचली आहे. ३७००० हून अधिकजणांना संक्रमण झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळाला आहे. शनिवारी यामुळे आणकी ८९ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या २६५६ प्रकरणे समोर आल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी सांगितले. शनिवारी ज्या ८९ जणांचा मृत्यू झाला. ती सर्व हुबेई प्रांतातील आहेत. त्याशिवाय हेनान येथील दोघांचाही मृत्यू झाला आहे.

... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:China appreciates PM Narendra Modi for offering solidarity and assistance to deal with coronavirus