पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... त्याच्याशी आम्हाला काय घेण-देणं पडलंय?

नितीशकुमार

राज्यात भाजप आणि शिवसेना युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संदर्भात कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसली तरी मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेतील दरी आणखीनच वाढली आहे. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे केंद्रातील अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी सोमवारी सकाळीच ट्विट करून राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्ष संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, आम्हाला याच्याशी काही देणे घेणे नाही. याबद्दल त्यांना (शिवसेना) त्यांचेच माहिती आहे.

भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का?: निरुपम

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सरकार स्थापण्याच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकले आहे... आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायचे असेल तर त्यांनी किमान समान कार्यक्रम निश्चित करून सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवार यांनी केले महत्त्वाचे विधान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार का, त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार का, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची बैठक सुरू आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chief minister of bihar nitish kumar on being asked shiv sena has left nda what do you have to say know what he said