पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सामूहिक लग्न सोहळ्यात विवाहित तरुणाने केले मेहुणीशी लग्न, वाचा पुढे काय झाले...

प्रातिधिनिक छायाचित्र

सामूहिक विवाह सोहळ्यात उत्तर प्रदेशात एकाने थेट आपल्या मेहुणीशी लग्न केले. आता या तरुणाविरोधात त्याची पहिली पत्नी आणि सासूबाईंनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. खरंतर सामूहिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांची लग्न झाल्याचे दाखवून सरकारी अनुदान लाटण्यासाठी या तरुणाचे त्याच्या मेहुणीशी लग्न लावण्यात आले. पण या घटनेनंतर त्याने आपल्या मेहुणील घरी आणले आणि आता तो तिला सोडण्यास तयार नसल्यामुळे कुटुंबियांपुढे पेच निर्माण झाला आहे.

'बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा'

गढमुक्तेश्वरमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे दहा वर्षांपूर्वी कोतवाली क्षेत्रातील गावात राहणाऱ्या तरुणीशी लग्न झाले. हा युवक गढमुक्तेश्वरमध्ये एका खासगी ठिकाणी काम करतो. लग्नानंतर या दाम्पत्याला तीन मुले झाली आहेत. गेल्या महिन्यात १४ तारखेला मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या युवकाने आपल्या मेहुणीशी लग्न केले. केवळ अनुदान लाटण्यासाठी हा तरुण लग्नाला उभा राहिला होता. 

... तोपर्यंत NRC, CAA लागू केले जाऊ शकत नाही; प्रशांत किशोर यांचे महत्त्वाचे वक्तव्य

लग्न झाल्यानंतर या तरुणीने आपल्या मेहुणीला घरी आणले. तो तिला आपल्या पत्नीसारखा वागवू लागला. यामुळे त्याची पहिली पत्नी नाराज झाली. तिने आणि तिच्या आईने या प्रकाराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकाराचा आम्ही तपास करीत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chief minister mass wedding scheme turn into money game when man make affair with sister in law and married her