पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिंदे गटाच्या मंत्र्यांना बरखास्त करा, CM कमलनाथांचे राज्यपालांना पत्र

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या गटातील १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आणखी आपली एक चाल खेळली आहे. शिंदे यांच्या गटातील ६ मंत्र्यांना बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.  

ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काही मंत्री आणि  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्यासोबत एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना समर्थन देणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यात मंत्री गोविंद सिंह राजपूत, प्रद्युम्न सिंह तोमर, इमरती देवी, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि महेंद्र सिंह सिसोदिया यांच्या नावाचा समावेश आहे. ज्या १९ आमदारांना राजीनामा दिला आहेत त्यात या मंत्र्यांचाही समावेश आहे.  

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे

काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देशसेवा ही माझी प्राथमिकता असल्याची प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेससोबत राहून देशसेवेच व्रत साध्य होणार नाही, असे लक्षात आल्यावर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असेही शिंदे म्हणाले होते. १८ वर्ष काँग्रेससोबत राहिल्यानंतर आता पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. मागील एक वर्षांपासून यावर मी विचार करत होतो. माझे कार्यकर्ते आणि लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असून नवी सुरुवात करण्याच्या दिशेने प्रवास सुरु करेन, असे त्यांनी म्हटले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Chief Minister Kamal Nath writes to Madhya Pradesh Governor recommends the immediate removal of six ministers