पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रजासत्ताक दिनः ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मुलांसह दिल्लीत दाखल

प्रजासत्ताक दिनः ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मुलांसह दिल्लीत दाखल (ANI)

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो शुक्रवारी चार दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचले. बोलसोनारो भारताबरोबर घनिष्ठ सामारिक संबंध आणि इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील. ते भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिवसानिमित्त आयोजित संचलनाचे मुख्य अतिथी असतील. आपल्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद मोदींशी चर्चा करतील. 

लेकीला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान न मिळाल्यान वडील नाराज

शुक्रवारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी विमानतळावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांचे स्वागत केले. मुरलीधरन यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, आपले सन्माननीय पाहुणे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांचे भारतातील जनता आणि सरकारडून मनपूर्वक स्वागत. हा दौरा आपल्या सामारिक संबंधांना नवीन ऊर्जा प्रदान करणे आणि प्रामुख्याने पुढे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतील. 

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो २४ ते २७ जानेवारीपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असतील. यादरम्यान २६ जानेवारीला ते भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित संचलनाचे ते प्रमुख पाहुणे असतील. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसह ८ मंत्री, ४ खासदार, ब्राझीलच्या संसदेतील ब्राझील-भारत मैत्री समूहाचे अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी आणि एक मोठे व्यापार प्रतिनिधी मंडळही दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्याबरोबर त्यांची मुलेही भारतात आले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chief Guest of Republic Day Parade 2020 President of Brazil Jair Messias Bolsonaro arrives at Delhi