पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढविण्याचे आदेश दिले.

राम मंदिरासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा - नरेंद्र मोदी

चिदंबरम यांच्या वतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यावर सरकारची बाजू मांडताना अधिवक्ता तुषार मेहता यांनी इतर कच्च्या कैद्यांना ज्या सुविधा मिळतात. त्या बचाव पक्षाने अर्ज करून मागायला हरकत नाही, असे सांगितले.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर

दिल्लीतील जोर बाग भागातील बँकेत असलेल्या आपल्या खात्याचा तपशील मिळावा, अशी मागणी चिदंबरम यांच्याकडून करण्यात आली. न्यायालयाने त्याला होकार दिला. दरम्यान, चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी वाढविण्याला कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला. केवळ एक प्रक्रिया म्हणून न्यायालयीन कोठडी वाढविली जाऊ नये. त्यामागे निश्चित असे कारण असले पाहिजे, असे कपिल सिब्बल यावेळी म्हणाले.