पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देवच या देशाचं रक्षण करो'; वाढदिवसानिमित्त चिदंबरम यांचे टि्वट

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणी तिहार कारागृहात कैदेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम हे सोमवारी ७४ वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त त्यांनी टि्वट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत ईश्वरच या देशाचं रक्षण करो, असे म्हटले आहे. चिदंबरम यांच्यावतीने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत टि्वटर हँडलवर ही पोस्ट केली आहे. 

या टि्वटमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, माझ्या कुटुंबीयांनी माझे मित्र, पक्षातील सहकारी आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांनी मी ७४ वर्षांचा झालोय याची आठवण करुन दिली आहे. मी ७४ वर्षांचा आहे. पण मी स्वतःला ७४ वर्षांचा युवक समजतो. माझा उत्साह वाढवण्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.

मी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत विचार करत आहे. फक्त एक आकडा संपूर्ण गोष्ट सांगते. ऑगस्टमध्ये निर्यात वाढीत ६.०५ टक्क्यांची घसरण झाली आहे. निर्यातीत २० टक्क्यांची वाढ झाल्याशिवाय देश ८ टक्क्यांच्या जीडीपी वाढीच्या दरापर्यंत पोहोचू शकणार नाही. देवच या देशाचे रक्षण करो, असे ते म्हणाले. 

राष्ट्रपती भवनाजवळ ड्रोन कॅमेरे वापरल्याने वडील आणि मुलाला अटक

दरम्यान, चिदंबरम यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे पुत्र कार्ती यांनींही शुभेच्छा दिल्या. कोणताही '५६ इंच' तुम्हाला रोखू शकत नाही, असे टि्वट कार्ती यांनी केले आहे. आज तुम्ही ७४ वर्षांचे झाले आहात. पण कोणताही ५६ इंच तुम्हाला रोखू शकत नाही. तुम्ही कधीच तुमचा वाढदिवस भव्यदिव्यपणे साजरा करत नाही. पण सध्या आपल्या देशामध्ये प्रत्येक छोट्या गोष्टींवर जल्लोष साजरा केला जात आहे, असे त्यांनी म्हटले.

मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसाचा जल्लोष करत आहे, आणि अशावेळी तुमचा आवाज दाबण्याची हीच योग्य वेळ होती. तुम्ही त्यांच्याविरोधात असहमत होत त्यांच्याविरोधात आवाज उठवत होता. सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यास मोठ्या हिंमतीची गरज हवी, असेही त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले.