पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला, चिदंबरम यांची दिल्ली सरकारवर टीका

पी चिदंबरम

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली.

राज्यसभा निवडणूक : ... या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

चिदंबरम यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा नक्की काय आहे हे समजून घेण्यात केंद्र सरकार इतकेच दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे. कन्हैय्या कुमार आणि इतरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याला हिरवा कंदील दाखविण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाचा मी विरोध करतो. या निर्णयाशी मी सहमत नाही. 

मुंबईत GST आयुक्तांकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता, CBI कडून चौकशी

गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदाच रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर केला जातो आणि हा कायदा आता कालबाह्य झाला आहे, असे त्यावेळी काँग्रेसने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी कन्हैय्या कुमारवरील देशद्रोहाच्या खटल्याला विरोध केला आहे.