आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीत सर्वोच्च न्यायालयाकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, सीबीआय प्रकरणात त्यांच्यासमोरील अडचणी कायम आहेत. ईडी प्रकरणात त्यांना अटक होणार नसली तरी पुढील सुनावणीपर्यंत त्यांना सीबीआय कोठडीतच राहावे लागेल. चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणाची सुनावणी २६ ऑगस्ट म्हणजे सोमवारी केली जाईल.
Appeal filed by P Chidambaram in Supreme Court against the Delhi High Court order in CBI case to be heard on August 26. https://t.co/Wi5mqCN80E
— ANI (@ANI) August 23, 2019
टेरर फंडिंगः कर्जात बुडालेल्या पाकला धक्का, 'ब्लॅकलिस्ट'मध्ये समावेश
दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देत चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी चिदंबरम यांना सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अखेर चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.