पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वातंत्र्य दिनी नरेंद्र मोदींनी केलेल्या तीन घोषणांचे चिंदबरम यांनी केले कौतुक!

पी चिदंबरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात उपस्थित केलेल्या तीन मुद्द्यांचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी कौतुक केले. वाढती लोकसंख्या रोखणे, एकदाच उपयोगी प्लॅस्टिकचा वापर थांबविणे आणि संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर ठेवणे, या तिन्ही मुद्द्यांचे चिदंबरम यांनी कौतुक केले.

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी नाकारणार?

चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. छोटे कुटुंब ठेवणे हे देशभक्तीचे काम आहे. संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर केला पाहिजे आणि एकदाच उपयोगी प्लॅस्टिकचा वापर बंद केला पाहिजे.

या तीन मुद्द्यांपैकी दुसरा मुद्दा देशाच्या सध्याच्या अर्थमंत्री आणि त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे ऐकला असेल, असा खोचक टोलाही चिदंबरम यांनी लगावला. 

मोदींच्या भाषणातील पहिला आणि तिसरा मुद्दा हा लोकचळवळीचा भाग बनला पाहिजे. अनेक स्वयंसेवी संघटना समर्पित वृत्तीने या क्षेत्रात काम करीत आहेत. या घोषणांचे कृतीत रुपांतर करण्यासाठी त्या नक्कीच तयार असतील, असे त्यांनी म्हटले आहे.