पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हल्ला : व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, फोटोंमुळे संशयाची सुई अभाविपकडे?

जेएनयू हल्ला

 जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात आता संशयाची सुई अभाविपकडे म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडे वळताना दिसत आहे. या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या दोन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील मेसेज आणि फोटोंमुळे या हल्ल्यात अभाविपचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र परिषदेनं हे आरोप नाकारले आहेत.

  हल्ल्यानंतर सोशल मीडियावर चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. साधरण साडेपाचच्या दरम्यान  व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील एका युजरनं  '' युनिटी अगेंस्ट लेफ्ट'  या ग्रुपवरून 'फेंड्स ऑफ आरएसएस' या ग्रुपवर एक लिंक शेअर केली. हा युजर्स जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेनुसार आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता असल्याचं कळत आहे. त्याचं नाव  योगेंद्र भारद्वाज असल्याचं समोर आलं आहे.

JNU हिंसाचार: कोलकात्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

भारद्वाजचं नाव सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमध्ये दिसत आहे. ज्यात भारद्वाजनं डाव्यांविरुद्ध विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची चिथावणी केली आहे. विद्यापीठातील दस्ताऐवजानुसार भारद्वाज हा संस्कृत विभागाचा विद्यार्थी असून तो गरज असेल तेव्हा अध्यापनाचंही काम करतो. हिंदुस्थान टाइम्सनं भारद्वाजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाइल बंद होता. 

जेएनयूमधील अभाविपचे सचिव मनिष जांगिड यांनी  व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप अस्तित्त्वात असल्याच्या  वृत्ताला दुजोरा दिला. मात्र या ग्रुपमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचे फोननंबर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही डाव्या संघटनांनी हेतूपुरस्कर समाविष्ट केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ''काही सर्व्हरच्या माध्यमातून आमचे मोबाइल नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करून आम्हीच त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असल्याचं दाखवण्यात आलं आहे, अशाप्रकारचे ग्रुप अस्तित्त्वात होते हेदेखील तेव्हा आम्हाला ठावूक नव्हतं'', अशी बाजू  मनिष जांगिड यांनी मांडली आहे. 

देश संकटात आहे, मोदी-शहांना जे हवंय तेच घडतंय, शिवसेनेचा आरोप

अभाविपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक राहुल चौधरी यांनी देखील या हल्ल्यात परिषदेचा हात असल्याचं वृत्त नाकारले आहे. ''आजकाल कोणीही, कोणालाही, कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करतं, त्याचे स्क्रीन शॉट काढून त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्यासाठी व्हायरल केले जातात. जर आम्ही हल्ल्याचा कट रचला आणि हल्ला केला याचे पुरावे त्यांच्याजवळ असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावे'', असं चौधरी म्हणाले. 
 यात दुसरा व्हायरल होणारा मोबाइल क्रमांक हा अभाविपचा आणखी एक सदस्य विकास पटेल याचा होता. 'दिल्ली विद्यापीठात खाजन सिंग स्विमिंग पुलच्या मार्गातून जाता येते' असं विकासनं लिहिलं होतं. त्याचा फोन क्रमांक हा 'फ्रेंड ऑफ आरएसएस' या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये होता. अभाविपच्या फेसबुक ग्रुपमधील एका पोस्टमध्ये विकास पटेलचा हाच मोबाइल क्रमांक दाखवत आहे, मात्र आता विकास पटेलनं आपलं फेसबुक अकाऊंटच डीलीट केल्याचं समजत आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यांसंबधी विकास पटेलची बाजूही जाणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाइल क्रमांक हा बंद होता. 

PM मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केला फोन

पटेलला हातात बांबू घेऊन इतर हल्लेखोरांबरोबर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये येताना अनेकांनी  पाहिलं आहे. तो अभाविपचा सदस्य आहे. आता त्यानं स्वत:चं फेसबुक अकाऊंट डीलीट केल्याचंही जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष साकेत मून यानं सांगितलं. 
मात्र पटेल किंवा इतर कोणत्याही अभाविपच्या सदस्यानं फेसबुक अकाऊंट बंद केल्याचं वृत्त चौधरी यांनी फेटाळून लावलं आहे. तिसरा क्रमांक हा काँग्रेस पक्षाशी निगडीत एका सल्लागाराचा आहे. या युजर्सचं नाव आनंद मंगनेले आहे. ''मी या ग्रुपमध्ये राहून केवळ हेरगिरीचं काम करत होतो, जर हल्ले झाले तर त्याची माहिती इतरांना देऊन सतर्क करण्याच्या उद्देशानं मी या ग्रुपमध्ये समाविष्ट झालो होतो'', असं आनंद मंगनेले यानं सांगितलं. ''जेएनयूच्या समर्थनासाठी काही लोक मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारापाशी येत आहेत तिथे काही करायचं आहे का?'' असा मेसेज व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये आनंदनं केला होता. 

JNU हिंसाचारः गेट वे ऑफ इंडिया येथून आंदोलकांची आझाद मैदानावर रवानगी

''मात्र  आपण या ग्रुपमध्ये हेरगिरीसाठी सहभागी झालो. हा ग्रुप तयार झाल्यानंतर तीन तासांनी म्हणजे जवळपास ८.३० च्या सुमारास मी त्यात सहभागी झालो. माहिती मिळवण्यासाठी मी त्यांच्यामधीलच एक व्यक्ती असल्यासारखं  भासवलं'' अशी बाजू हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना  आनंदनं ठेवली. जेएनयू हल्ल्यातील हल्लेखोरांचे फोटो व्हायरल होत असले तरी हे फोटो कदाचित  एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा संशय चौधरी यांनी व्यक्त केला आहे.