पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...इस्रो प्रमुखांनी व्यक्त केली होती ही भीती

पुढच्या क्षणी काय होईल, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये धाकधूकही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २० ऑगस्ट रो

भारत चंद्रावर नवा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर असताना अखेरच्या क्षणाला विक्रम लँडरचा संपर्क तुटला. इस्रोने याबाबत अद्याप काहीही निष्कर्ष काढलेला नाही. विक्रम लँडर्शी संपर्क होईल, अशी आशा अद्यापही जिवंत आहे. या मोहिमेतील विक्रम लँडरचा चंद्रापर्यंतचा अखेरच्या टप्प्यातील ३५ किमीचा प्रवास अत्यंत खडतर असाच होता.  जवळपास १५ मिनिटांचा हा काळ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक असेल, असे इस्रोचे प्रमुख डी.के.शिवन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.   

चांद्रयान 2 : मोहिमेबद्दलचे सर्व अपडेट्स  

मध्य रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सज्ज झाला. विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर आहे. हा रोव्हर चंद्रावर शोधकार्याचे काम करणार आहे. लँडिंगची प्रक्रिया ही नवजात अर्भकासारखी असेल, असे इस्रोचे प्रमुख डी.के.शिवन  यांनी म्हटले आहे. विक्रम लँडरचे लँडिंग हे नवजात अर्भकाला हातळण्यासारखे असेल आणि ते आपण कसे हाताळणार हे महत्त्वाचे ठरेल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचे कुठलेही नुकसान होणार नाही ही काळजी शास्त्रज्ञांना घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.   

चांद्रयान-२: भारत इतिहास रचेल, मी खूप उत्साहित- पंतप्रधान मोदी

२ सप्टेंबरला विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळा झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोनवेळा यशस्वीरित्या कक्षाबदल करत विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचला आहे. चंद्रावर लँडिंग करण्याची प्रक्रिया खूप कठीण असून आमच्यासाठी ही सर्व प्रक्रिया नवीन आहे.  त्यामुळे शेवटचा १५ मिनिटांचा काळ आमच्यासाठी तणावाचा असेल, असे शिवन यांनी म्हटले होते. या मोहिमेबाबत अद्यापही आशा जिवंतच आहे. यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.