पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रतीक्षा संपली, १५ जुलैला चांद्रयान-२ झेपावणार

चांद्रयान २ (एएनआय)

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी अखेर चंद्रावर भारताचे दुसरे पाऊल ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे. चंद्राकडे झेपावण्यास तयार असलेले मिशन चांद्रयान-२ च्या लाँचिंगची घोषणा आज (बुधवार) बंगळुरात करण्यात आली. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवान यांनी याची घोषणा केली. दि. १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ झेपावणार आहे. या मोहिमेची माहिती देणारी वेबसाइटही सादर करण्यात आली.

सिवान म्हणाले की, चांद्रयान -२ ला १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. यामध्ये लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर एक रोबोटिक आर्टिकल आहे. त्याचे वजन २७ किलो आणि उंची १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर आहे, ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर आहे. 

चांद्रयान-२ ला आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून लाँच केले जाईल. मागील दहा वर्षात दुसऱ्यांदा चंद्रावर यान पाठवले जात आहे.