पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान-२ ने पाठवला चंद्रावरील खड्ड्याचा 3D फोटो

चंद्रावरील खड्ड्याचा फोटो

चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने चंद्रावरील खड्ड्याचा ३ डी फोटो पाठवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने बुधवारी हा फोटो ट्विट केला आहे. चांद्रयान -२ च्या टेरेन मॅपिंग कॅमेरा- २ द्वारे चंद्रावरील खड्ड्याचा हा ३ डी फोटो काढण्यात आला आहे. चांद्रयानचे आर्बिटर चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे.

राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात: रणजितसिंह निंबाळकर

खड्ड्याचा फोटो ट्विट करत इस्रोने असे सांगितले  की, ' चांद्रयान २ च्या टीएमसी -२ मधून घेतलेल्या खड्ड्याचा ३ डी फोटो पहा. टीएमसी -२ वरून चंद्राच्या पृष्ठभागासह डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स तयार करण्यासाठी ५ एम स्पेटियल रिझॉल्यूशन आणि स्टिरियो ट्रिपलेटमध्ये फोटो घेतले जाऊ शकतात.'

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला महत्त्व

चंद्रावरील खड्ड्याचे ३ डी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रोच्या कामाचे कौतुक केले जात आहे. चांद्रयान-२ने मोहिमे दरम्यान तिसऱ्यांदा फोटो पाठवला आहे. या आधी चांद्रयान २ ने अंतराळातून पृथ्वीवरील फोटो आणि चंद्रावरचा फोटो पाठवला होता. 

जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; फी वाढीचा निर्णय मागे

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष (सीएसओ) के सिवन यांनी सांगितले की, 'चांद्रयान -२ मोहिमेने आतापर्यंत ९८ टक्के उदिष्ट्य पूर्ण केले आहे. ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. ऑर्बिटर साडेसात वर्ष कार्यरत राहिल. तसंच विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी वैज्ञानिक खूप मेहनत करत आहेत.'

आमच्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं होतं, अमित शहांनी सोडले मौन