पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NASA ने जारी कली Chandrayaan-2 संदर्भातील छायाचित्रे

नासाने जारी केलेले छायाचित्र

चांद्रयान २  (Chandrayaan-2) मोहिमेतील विक्रम लँडर (Vikram Lander) संदर्भात नासाने (NASA) मोठा खुलासा केला आहे. अमेरिकन अंतराळ संस्थेने शुक्रवारी चांद्रयान २ च्या विक्रम लँडरची चंद्राच्या कक्षेतील काही छायाचित्रे जारी केली आहेत. या छायाचित्रातून विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिग झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

जाग वाटपावरून युतीत दुमत, भाजप देत असलेल्या जागा

चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या नासाच्या लूनर रिकॉनिस्सेस ऑर्बिटरने (LRO) ही छायाचित्रे टिपली आहेत. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु होती तेव्हा नासाचे ऑर्बिटर याच कक्षेतून परिभ्रमण करत होते. त्यावेळी नासाच्या ऑर्बिटरने ही छायाचित्रे कैद केली आहेत.    

राजू शेट्टींना धक्का! 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष तुपकरांचा राजीनामा

नासाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस ही छायाचित्रे टिपली असल्याने ती थोडी अंधूक आहेत. त्यामुळे विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके कोणत्या भागात लँडिग झाले हे समजू शकलेले नाही. छायाचित्र जवळपास १५० किमी अंतरावरुन टिपल्याचा उल्लेखही नासाने आपल्या ट्विटमध्ये केला असून विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिग झाल्याचे नासाने म्हटले आहे. उल्लेखनिय आहे की, ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी विक्रम लँडरचा इस्रो मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chandrayaan-2 NASA releases high resolution images of Chandrayaan 2 landing site says Vikram Lander had hard landing