पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान २ : विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार, शास्त्रज्ञांमध्ये कमालीची उत्सुकता

चांद्रयान २

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेसाठी शनिवारची पहाट अत्यंत महत्त्वाची असणार आहे. शनिवारी पहाटे दीड ते अडीच या वेळेत चांद्रयान २ मधून पाठविण्यात आलेले विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. २२ जुलै रोजी चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ दिवसाचे १६ तास काम करीत आहेत. चांद्रयान २ च्या प्रवासातील प्रत्येक घटकाचे मोजमाप केले जाते आहे. चांद्रयान २ च्या परफॉर्मन्सवरही सातत्याने लक्ष ठेवले जाते आहे. या सर्वाचा परमोच्च बिंदू शनिवारी गाठला जाणार आहे. त्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

चिदंबरम यांची तिहारमध्ये रवानगी, ७ क्रमांकाच्या कारागृहात मुक्काम

भारताकडून पहिल्यांदाच अशा पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी यान पाठविण्यात आले आहे. इस्रोचे अध्यक्ष के शिवन यांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा क्षण अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत यानाच्या प्रवासाची जी माहिती बंगळुरूमधील इस्रोच्या शास्त्रज्ञांना मिळते आहे. त्यावरून आम्ही योग्य दिशेने प्रवास करीत आहोत, असे स्पष्ट होते, असे शिवन यांनी सांगितले. पण त्याचवेळी शास्त्रज्ञांमध्ये कमालीची उत्सुकताही आहे. पुढच्या क्षणी काय होईल, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये धाकधूकही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २० ऑगस्ट रोजी चांद्रयान २ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

चांद्रयान १ चे प्रकल्प संचालक मलयस्वामी अण्णादुराई म्हणाले, चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया ही काहीशी गुंतागुंतीची असते. भारताकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्यामुळे सर्व गणिते आणि मोजमापे बिनचूक असली पाहिजेत. त्यामुळे यातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. भारताच्या यशातून जगाला आपली तांत्रिक प्रगती कळणार आहे. 

'सरकारला पैशांची लालसा नाही, वाहतूक नियमांचे पालन व्हावे'

चांद्रयान २ चे यश हे भारताच्या अंतराळ संशोधन मोहिमेतील मोठा टप्पा ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून आपले काम करू लागल्यावर त्या माध्यमातून तेथील शास्त्रीय माहिती शास्त्रज्ञांना मिळणार आहे. ज्याचा अभ्यास करून पुढील आखणी करणे शक्य होणार आहे.