पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धैर्य सोडू नका! PM मोदींनी थोपटली शास्त्रज्ञांची पाठ

इस्त्रो प्रमुख शिवम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

चंद्रावर उतरण्यास अवघ्या काही क्षण बाकी असताना विक्रम लँडरशी असलेला इस्रो कार्यालयाचा संपर्क तुटला. भारताच्या ऐतिहासिक मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी इस्रोच्या कार्यालयात उपस्थित होते. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर या मोहिमेत काम  करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचा चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. यावेळी नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांचे कौतुक केले.

चांद्रयान 2 : अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटला

इस्त्रो प्रमुख शिवन यांनी संपर्क तुटल्याची माहिती दिल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावणारे शब्द उच्चारले. 
मोदी म्हणाले की, आयुष्यात चढ-उतार येत असतात. हिम्मत ठेवा, निराश होऊ नका, तुमचा देशाला अभिमान आहे.   इथपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद असाच आहे.     

...म्हणून शेवटची १५ मिनिटे तणावाची असतील : इस्रो प्रमुख

संपर्क तुटल्यानंतर तुम्ही निराश झाल्याचे पाहिले. पण निराश होण्याची काहीच गरज नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. माझ्यासह संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, अशा शब्दांत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: chandrayaan 2 moon landing pm narendra modi at isro there are ups and downs in life this is not a small achievement