पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान- २ चे यशस्वी प्रक्षेपण; टीम इस्रोवर शुभेच्छांचा वर्षाव

चंद्रयान -२ प्रक्षेपण

भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रीहरीकोटा येथून चांद्रयान- २चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. त्याबद्दल टीम इस्रोच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील चांद्रयान- २ च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील इस्रोच्या कामगिरीचे ट्विटरवरुन कौतुक केले आहे. तसंच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'चांद्रयान- २ चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन. महत्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ करुन टीम इस्रोने इतिहास रचला आहे. शास्त्रज्ञ आणि टीम इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल संपूर्ण राष्ट्राला गर्व आहे.'

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी देखील चांद्रयान- २ च्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चांद्रयान- २ च्या यशस्वी प्रक्षेपणावर सर्वांनी शास्त्रज्ञांचे कौतुक करत शुत्रेच्छा दिल्या.