पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो, थोडा धीर धरा, इस्रोच्या माजी प्रमुखांचे मत

चांद्रयान २

चांद्रयान २ मधील विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो. फक्त या संदर्भातील माहितीचे विश्लेषण होईपर्यंत धीर धरावा लागेल. विक्रम लँडर आणि ऑर्बिटर यांच्यातील संपर्क यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे विक्रम लँडर चंद्रावर उतरताना क्रॅश झाला असेल, असे मला वाटत नाही, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी संचालक डी शशीकुमार यांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही अभिनंदनीय - नरेंद्र मोदी

शशीकुमार म्हणतात, क्रॅश लँडिंगमुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला असे मला वाटत नाही. विक्रम लँडरचे चंद्रावरील लँडिंग सॉफ्ट होते की क्रॅश होते हे माहितीवरून स्पष्ट होईल. माझ्या मताप्रमाणे, विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाले असे मला वाटत नाही. कारण विक्रम लँडर आणि ऑर्बिटर यांच्यातील संपर्क यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे थोडा धीर धरला पाहिजे. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतरच नेमके काय घडले आहे हे समजू शकेल.

... अखेर इस्रो प्रमुख के सीवन यांना अश्रू अनावर

चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरापर्यंत विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क होता. पण नंतर संपर्क तुटला आहे. २ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर आणि ऑर्बिटर हे दोन्ही विलग करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले होते. त्यानंतर ७ सप्टेंबर म्हणजे आजच पहाटे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होता. त्यानंतर त्यातून प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन त्याचे काम सुरू होणार होते. पण आता विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असल्यामुळे नक्की काय घडले हे समजू शकलेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chandrayaan 2 landing Vikram may have landed on moon lets wait for analysis says former Isro chief