पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान-२: भारत इतिहास रचेल, मी खूप उत्साहित- पंतप्रधान मोदी

चांद्रयान-२: भारत इतिहास रचेल, मी खूप उत्साहित आहे- पंतप्रधान मोदी

चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा क्षण काही तासांवर आला आहे. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी शास्त्रज्ञांसह सर्वंच जण खूप उत्साहित आहेत. याचदरम्यान पंतप्रधान मोदींनीही नागरिकांना या क्षणाचा साक्षीदार होण्याचे आणि या क्षणांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी टि्वट करत म्हटले आहे की, १३० कोटी देशवासीय या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही तासांत चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करेल. भारत आणि संपूर्ण जग या शास्त्रज्ञांचा चमत्कार पाहील, 

लँडर विक्रमच्या लँडिंगदरम्यान पंतप्रधान मोदी हे इस्रोत उपस्थित असतील. मध्यरात्री १.३० ते २.२०च्या दरम्यान लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा हा ऐतिहासिक अंतराळ कार्यक्रम पाहण्यासाठी मी बंगळुरुतील इस्रोत उपस्थित असणार आहे. यामुळे मी खूप उत्साहित आणि आनंदी आहे. जे युवक याप्रसंगी माझ्यासोबत उपस्थित असतील त्यांनी 'मायगव्ह'वर इस्रोची प्रश्नमंजुषा जिंकली आहे. ते खूप प्रतिभाशाली आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवला होता. युवकांना विज्ञान आणि अंतराळात मोठा रस आहे. हे चांगले संकेत आहेत. 

त्यांनी पुढे म्हटले की, मी २२ जुलै म्हणजेच लाँचिगच्या तारखेपासून चांद्रयानाशी संबंधित माहिती सातत्याने जाणून घेत आहे. या अभियानातून भारतीयांची प्रतिभा आणि मेहनत दिसून येते. याचा कोट्यवधी भारतीयांचा फायदा होईल.