पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान २ च्या यशात आणखी एक मानाचा तुरा, विक्रम लॅंडर आणि ऑर्बिटर स्वतंत्र

भारताची महत्वकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-२ पासून वेगळे होण्याबरोबरच विक्रम लँडरने चंद्राकडे प्रस्थ

भारताची महत्वकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-२ पासून वेगळे होण्याबरोबरच विक्रम लँडरने चंद्राकडे प्रस्थान केले. विक्रम लँडर ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करेल आणि त्याच्या ४ तासांनंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. जो चंद्राच्या पृष्ठभागावर १४ दिवसांत एकूण ५०० मीटरचे अंतर पूर्ण करेल. विक्रमने चंद्राला स्पर्श केल्यानंतर शास्त्रज्ञांना चंद्राकडून पृथ्वीची वास्तविक अंतराची माहिती होईल. सध्या हे सर्वांसाठीच एक कोडे बनले आहे. 

दरम्यान, अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चांद्रयान-२ बरोबर आपला एक लूनर लेजर रेट्रोरेफ्लेक्टर एरे पाठवला आहे. जो शास्त्रज्ञांना चंद्राचे पृथ्वीपासूनचे वास्तविक अंतर सांगेल. नासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर जास्तीत जास्त लेजर रेट्रोरेफ्लेक्टर एरे पाठवू इच्छितो. 

शास्त्रज्ञांच्या मते, लेजर लाइट्स परत पृथ्वीवर आल्यास लँडरच्या वास्तविक ठिकाणाची माहिती होईल. यामुळे पृथ्वीपासून चंद्राच्या वास्तविक अंतराचे अचूक आकलन करता येऊ शकेल. चंद्राच्या पृष्ठभागावर अशा पद्धतीचे ५ उपकरण आधीपासूनच उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे चंद्राचे वास्तविक अंतर अद्याप समजू शकलेले नाही.