पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आनंदाची बातमी! 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण या महिन्याअखेर शक्य

चांद्रयान २

तांत्रिक दोषामुळे निर्धारित वेळेच्या ५६ मिनिटे अगोदर स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण येत्या महिन्याअखेर करण्यात येण्याची शक्यता आहे. 'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणामध्ये जो तांत्रिक दोष आढळला होता. तो फार गंभीर स्वरुपाचा नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्षेपकाचे भाग सुटे करून तो दूर करण्याची गरज नाही. प्रक्षेपक आहे तसाच ठेवूनही तांत्रिक दोष दूर केला जाऊ शकतो. हा दोष जर दूर झाला, तर या महिन्याअखेरिस हे यान अवकाशात झेपावू शकते. या हालचालींशी संबंधित शास्त्रज्ञाने ही माहिती दिली.

'कर्नाटकचे बंडखोर आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित राहू शकतात'

प्रक्षेपकामधील इंधन पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये गळती होत असल्याचे लक्षात आल्यामुळेच 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण स्थगित कऱण्यात आले होते. मुळात दोष वेळीच लक्षात आला आणि तो कसा दूर करायचे हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. हा तांत्रिक दोष प्रक्षेपण स्थळावरच दूर केला जाऊ शकतो. त्यासाठी प्रक्षेपकाचे भाग सुटे करण्याची गरज नाही, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील ISRO माजी शास्त्रज्ञांनी सांगितले. संबंधित शास्त्रज्ञ अद्याप या प्रकल्पावर काम करीत आहेत.

ऑक्सिजन आणि हायड्रोजनवर आधारित हेलियम इंधन जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनसाठी वापरले जाते. प्रक्षेपकाच्या प्रणोदक टाकीमध्ये कोणताही बिघाड होऊ नये, यासाठीच हे इंधन वापरले जाते. यामुळे प्रणोदक टाकीमध्ये बुडबुडेही तयार होत नाहीत. 

राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची शक्यता

'चांद्रयान २'चे प्रक्षेपण गेल्या सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरून होणार होते. पण प्रक्षेपकातील तांत्रिक दोषामुळे हे उड्डाण स्थगित करण्यात आले होते. इस्रो या महिन्याच्या अखेरपर्यंत 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण करू शकते.