पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चांद्रयान २'चा यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश, इस्रोच्या यशात आणखी भर

चांद्रयान २

चांद्रयान २ ने मंगळवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यामुळे सलग दुसऱ्यांदा चंद्रावर यान पाठविण्याचा भारताचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. येत्या सात सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून, त्याचा तेथील प्रवास सुरू होणार आहे. 

ट्रम्प म्हणाले, काश्मीरमध्ये स्थिती कठीण, पण चर्चा चांगली झाली

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, चांद्रयान २च्या प्रवासामध्ये चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता. चांद्रयान २ने यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यामुळे इस्रोच्या यशात आणखी भर पडली आहे. पृथ्वीप्रमाणेच चंद्रही फिरत असतो. त्यामुळे त्याच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी अनेक घटकांचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. 

३५४ कोटींचा बँक घोटाळाः कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीला अटक

चांद्रयान २ला चंद्राच्या कक्षेत पाठविणे हा या मोहिमेतील सर्वात अवघड टप्पा होता. आता चंद्रावर यान उतरविणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा असेल. येत्या ७ सप्टेंबरला त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे महत्त्वाचे काम चांद्रयान २ करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत चार महत्त्वाचे टप्पे पार करावे लागणार आहेत. येत्या २ सप्टेंबरला या प्रवासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे.