पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान २ मधील अंतिम टप्पाही यशस्वी, शनिवारी विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

चांद्रयान २

भारताची महत्त्वपूर्ण चांद्रमोहिम चांद्रयान २ अखेरच्या टप्प्यात असून, येत्या शनिवारी ७ सप्टेंबरला चांद्रयान २ च्या माध्यमातून पाठविण्यात आलेले विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार आहे. या प्रवासातील महत्त्वाचा आणि अखेरचा टप्पा बुधवारी पहाटे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) पूर्ण करण्यात आला. चांद्रयान २ मधून विक्रम लँडर विलग करण्याचा दुसरा टप्पा बुधवारी पहाटे यशस्वी झाल्याचे इस्रोने म्हटले आहे.

पाक नरमले! भारतातून औषधी वस्तूंच्या आयातीला मंजुरी

बुधवारी पहाटे ३.४२ वाजता चांद्रयान २ पासून विक्रम लँडर विलग करण्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. यानातील यंत्रणेच्या माध्यमातूनच नऊ सेकंदात विक्रम लँडर विलग करण्याचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला, असे इस्रोने म्हटले आहे. येत्या ७ सप्टेंबरला विक्रम लँडरच चंद्राच्या अभ्यासासाठी तिथे उतरविले जाणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबरला पहाटे एक ते दोन या वेळेत विक्रम लँडर चंद्रावर उतरविले जाणार आहे. पहाटे दीड ते अडीच या वेळेत विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल. चंद्राच्या याच भागाचा अभ्यास करण्यासाठी भारताने हे चांद्रयान २ मोहिम आखली आहे.

तरुणाची स्कूटी १५ हजारांची अन् चलान फाडले २३ हजार

चांद्रयान २ आणि विक्रम लँडर हे योग्य पद्धतीने आपले काम करीत आहेत, अशीही माहिती इस्रोने दिली आहे.