पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नासाच्या त्या दाव्यानंतर इस्रो प्रमुख के सिवन यांनी विक्रम लँडरबद्दल दिली महत्त्वाची माहिती

के सिवन

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचे अवशेष दिसल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने मंगळवारी जाहीर केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी या मोहिमेतील ऑर्बिटरला आधीच विक्रम लॅंडरचे अवशेष दिसले होते. आम्ही आमच्या वेबसाईटवर त्याची माहितीसुद्धा दिली होती, असे म्हटले आहे.

गुगलमध्ये सुंदर पिचाईंकडे आणखी मोठी जबाबदारी, अल्फाबेटचे CEO पद

एएनआयला दिलेल्या माहितीत सिवन यांनी म्हटले आहे की, आमच्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. आमच्या वेबसाईटवर आम्ही याची माहिती दिली होती. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. 

इस्रोच्या वेबसाईटवर १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे की, चांद्रयान २च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला आहे. पण अद्याप विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाही. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नक्की काय केलं वाचा...

इस्रोकडून या संदर्भातील फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. नासाकडून मंगळवारीच विक्रम लँडरचे अवशेष दिसल्याचे जाहीर करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या काही क्षण आधी विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chandrayaan 2 After Nasa shares Vikram landers image Isro chief K Sivan claims our own orbiter had located it