पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर

चांद्रयान २

तांत्रिक दोषामुळे अगदी ऐनवेळी स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून ISRO गुरुवारी जाहीर करण्यात आली. चांद्रयान २ चे प्रक्षेपण येत्या सोमवारी, २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी होणार आहे. इस्रोकडून ही माहिती देण्यात आले.

चांद्रयान २ चे प्रक्षेपण गेल्या सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरून होणार होते. पण उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी प्रक्षेपकामध्ये तांत्रिक दोष असल्याचे दिसून आल्यावर हे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले होते. हा दोष फार मोठा नसून, तो प्रक्षेपकाचे सर्व भाग सुटे करून दुरुस्त करण्याची गरज नाही. प्रक्षेपक तळावरच हा दोष दूर केला जाऊ शकतो, असे इस्रोच्या एका माजी शास्त्रज्ञाने आधीच स्पष्ट केले होते. त्यावेळीच हे यान जुलै अखेरपर्यंतच अवकाशात झेपावू शकते, असे सांगण्यात आले होते. अखेर हा अंदाज खरा ठरला. आता हे यान सोमवारी दुपारी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपक तळावरूनच अवकाशात झेपावणार आहे.

जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साह्याने इस्रोकडून चांद्रयान २ अवकाशात सोडण्यात येणार आहे.