पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करत चंद्राबाबूंनी घेतली ममतांची भेट

आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमताचे संकेत मिळाले असले तरी विरोधकांनी सत्ता स्थापनेची आशा अजूनही सोडलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी आज (सोमवारी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. नायडू आणि ममता यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याची सत्तास्थापनेसाठी कसे प्रयत्न करता येतील यासंदर्भातील मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.  

NDA ची मोठी बैठक, दिग्गज नेते सहभागी होणार

विरोधकांच्या महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडू गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहेत. यापूर्वी त्यांनी समाजवादीचे अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या सप्रीमो मायावती, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या भेटी घेतल्या होत्या.  

'आता पुढची तयारी', अखिलेश-मायावती यांच्यात तासभर चर्चा

२३ मे रोजी लोकसभेचे निकाल समजणार आहेत. एक्झिट पोलचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या काही दिग्गज नेत्यांनी अंतिम निकाल एक्झिट पोलप्रमाणेच असेल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विरोधकांनी मात्र एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करुन मोदी सरकारला सत्तेबाहेर काढण्याचे मनसुबे अजूनही कायम ठेवले आहेत.