पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकीय समीकरणांना वेग, चंद्राबाबूंनी घेतली शरद पवारांची भेट

चंद्राबाबू नायडू आणि शरद पवार (Photo-ANI)

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा अजून बाकी आहे. परंतु, विरोधक संभावित समीकरणांसाठी सक्रिय झाले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकर घेतला असून त्यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नायडूंची ही हालचाल तिसऱ्या आघाडीचे सुतोवाच दिसत आहेत.

२६/११ वेळीही विलासराव देशमुखांना मुलाच्या करिअरची चिंता - पियूष गोयल

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे सरचिटणीस गुलामनबी आझाद यांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही पंतप्रधानपदाचा त्याग करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यापासून माघार घेतली होती. परंतु, असे सांगितले जात आहे की, भाजपला बहुमत न मिळाल्यास काँग्रेस एखाद्या विरोधी नेत्याच्या नावावर पंतप्रधानासाठी सहमती दर्शवतील. 

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

चंद्राबाबू यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांच्यावर सरकारचे समर्थक असल्याचा आरोप केला. महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली होती.