पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमधील हिंसाचाराला राज्य सरकारचं जबाबदार : गृहमंत्रालय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेला ममता बॅनर्जी यांचे सरकारचं जबाबदार आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटना या चिंताजनक असल्याचे मत केंद्र सरकारने व्यक्त केले. यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून ममता बॅनर्जी सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना हे राज्य सरकारचे अपयश आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरही राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या याबद्दलही गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  

लोकसभेचा चेहरा बदलणार, अडवाणी-जोशींच्या जागेवर नवे 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावे, असा उल्लेख देखील गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाच्या मते, शनिवारी उत्तरेकडील २४ परागणा जिल्ह्यातील हिंसाचारामध्ये चार लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक लोकांनी जीव गमावल्याचे समोर येत असल्याने गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

पंतप्रधान मोदी श्रीलंकेत, कोलंबो स्फोटातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:centre sends advisory to west bengal mamata banerjee govt expresses deep concern over continuing violence