पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्राचा ममतांना धक्का, पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला केंद्र सरकारने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे नाव बदलून 'बांगला' ठेवण्याचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभाने २०१६ मध्ये राज्याचे नाव पश्चिम बंगाल ऐवजी बांगला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. या प्रस्तावात पश्चिम बंगालचे नाव बंगालीत बांगला, इंग्रजीत बेंगॉल आणि हिंदी बंगाल राहिल असे म्हटले होते. विरोधी पक्ष काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी याला विरोध केला होता.

देशात सध्या 'सुपर इमर्जन्सी', ममता बॅनर्जींचा मोदींवर घणाघात

केंद्र सरकारने पण राज्याच्या तीन नावांवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने ८ डिसेंबर २०१७ मध्ये एक प्रस्ताव पारित करत सर्व भाषांमध्ये बांगला ठेवण्याचा निर्णय घेतला होता.