पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारी नोकरीत गरीब सवर्णांनाही वयोमर्यादेत सूट देण्याची तयारी

सरकारी नोकरीत गरीब सवर्णांनाही वयोमर्यादेत सूट देण्याची तयारी

सामान्य वर्गातील गरीब विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांनाही कमाल वयोमर्यादेत ओबीसीप्रमाणे सूट दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (डीओपीटी) पत्र लिहून याबाबत विनंती केली आहे. सरकारी नोकरीत ओबीसी विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट मिळते. तर एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांची सूट दिली जाते. 

सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या वतीने केंद्रीय कार्मिक, लोक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वेगवेगळ्या लोकांकडून अर्ज मिळाले आहेत. यामध्ये ईडब्ल्यूएस श्रेणीच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीतील वयोमर्यादेत सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारी नोकरीत इतर आरक्षित वर्ग एससी, एसटी आणि ओबीसीची कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते. त्याचबरोबर सर्व संबंधित प्राधिकरणांना या संबंधी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत असेही या अर्जांत म्हटले आहे. 

मोदी सरकारने मागील दोन वर्षांत दिल्या ३.८१ लाख नव्या नोकऱ्या

गुणांमध्ये सूट देण्यावरही विचार शक्य

स्पर्धा परिक्षेत आरक्षित श्रेणींच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्येही सूट दिली जाते. पण ईडब्ल्यूएस आरक्षणात आतापर्यंत अशी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. सध्या सामाजिक न्याय मंत्रालयाने केवळ वयाचा मुद्दा उठवला आहे. परंतु, गुणांवर सूट देण्याचा विचारही कार्मिक मंत्रालय विचार करु शकतो. कारण दुसऱ्या आरक्षित विद्यार्थ्यांना अशी सुविधा मिळालेली आहे.

विद्यापीठात आरक्षणाची अधिसूचना जारी

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विभागांऐवजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना आरक्षणाचा आधार मानणाऱ्या कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. याचबरोबर कायद्याच्या प्रभावात आला आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसीबरोबर ईडब्ल्यूएस श्रेणीसाठीही आरक्षणाची तरतूद केली आहे.

Good News: नोकरी गेल्यानंतरही पीएफ खाते सुरु राहणार

ओबीसीला ३, एससी-एसटीला ५ वर्षांची सूट

केंद्र सरकारमध्ये अतिरिक्त नियुक्त्यांमध्ये सध्या ओबीसीला कमाल वयोमर्यादा ३ वर्षे तर एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांची सूट दिली जाते. उदा. यूपीएससीच्यी नागरी सेवा परिक्षेत सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३२ वर्षे आहे. त्याचपद्धतीने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३५ वर्षे आणि एससीएसटी विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३७ वर्षे आहे.