पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात विविध भागात अडकलेल्या प्रवासी कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या येथे अडकलेल्या लोकांना त्यांच्या गृह राज्यात पाठवण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणण्यासाठी प्रोटोकॉल निश्चित करावा असे म्हटले आहे. म्हणजेच आता विविध राज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणेल आणि आपल्या येथे अडकलेल्या दुसऱ्या राज्यातील नागरिकांना तिथे पाठवून देईल. 

हैदराबादमध्ये स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक

गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल अधिकारी नेमतील आणि मग हे अधिक आपल्या इथे अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यांदरम्यान वाहतूक होणार आहे. तिथे हे अधिकारी एकमेकांशी संपर्कात राहतील. रस्ते मार्गाने या नागरिकांची ने-आण केली जाईल. 

जे लोक जाऊ इच्छितात त्यांची स्क्रिनिंग होईल. जर त्यांच्यात कोविड-१९ ची काही लक्षणे दिसली नाही तर त्यांना परवानगी दिली जाईल. 

या नागरिकांची ने-आण करण्यासाठी बसचा उपयोग करता येईल. बस सॅनिटाईज केल्यानंतर यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार नागरिकांना बसवले जाईल. 

व्हाइट हाऊसनं पंतप्रधान मोदींना केलं अनफॉलो

कोणतेही राज्य या बसेसना आपल्या सीमेत प्रवेश करण्यासाठी रोखता येणार नाही. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर नागरिकांची स्थानिक आरोग्य संस्थांकडून तपासणी केली जाईल. बाहेरहून आलेल्या लोकांना फिरण्यास परवानगी नसेल. त्यांना होम क्वारंटाइनमध्येच राहावे लागेल. गरज पडल्यास त्यांना रुग्णालय/आरोग्य केंद्रात दाखल केले जाऊ शकते. वेळोवेळी त्यांची तपासणी केली जाईल. 

या नागरिकांना आरोग्य सेतू ऍपचा वापर करावा लागेल. याच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.

5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार