पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली, काँग्रेसचा पुनरुच्चार

सोनिया गांधी

दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचारामध्ये केंद्र आणि दिल्ली या दोन्ही सरकारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, याचा पुनरुच्चार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. त्याचबरोबर या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये लवकरात लवकर स्थिती पूर्वपदावर आली पाहिजे. दिल्लीच्या सर्व भागात शांतता असली पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतींना दिले.

कुणाल कामरावरील प्रवास बंदी इंडिगोकडून ३ महिन्यांनी कमी

राष्ट्रपतींना भेटल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया गांधी म्हणाल्या, हिंसाचार रोखण्यासाठी सक्रीयपणे पावले उचलण्याऐवजी केंद्र सरकार आणि नव्याने निवडून आलेले दिल्लीतील सरकार या दोहोंनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अनेकांची घरे आणि संसार हिंसाचारात उद्ध्वस्त झाले. 
काँग्रेसच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल आणि रणदीप सुर्जेवाला यांचा समावेश होता.